Coronavirus: मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वधू-वरांनी लग्नात मास्क घालून पार पाडला विवाह सोहळा
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Wikimedia Commons)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने सरकाककडून लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. या लॉकडाउनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही धार्मिक किंवा अन्य कार्यक्रमाचे आयोजनांना देण्यात आलेली परवनागी रद्द करण्यात आली आहे. त्याचसोबत नागरिकांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याठी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेने नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क घालणे अनिवार्य असल्याची सुचना दिली आहे. याच पार्श्वभुमीवर एका कपल्सने त्यांच्या लग्नात मास्क घालून विवाह सोहळा साध्या पद्धतीने पार पाडला आहे.

रामकिशन चव्हाण याने त्याची गर्लफ्रेंड रिमा सिंग हिच्यासोबत कांदिवली मधील एका मंदिरात वैदिक पद्धतीने लग्न केले. मात्र राज्यात लॉकडाउनचे आदेश असल्याने या लग्नात वधू-वरांच्या घरातील मंडळी किंवा मित्रमैत्रीणींनी कोणीही उपस्थिती लावली नाही. ऐवढेच नाही तर वधू-वराने मास्क घालून त्यांचा विवाहसोहळा पार पाडला आहे. या लग्नसोहळ्यात सोशल डिस्टंन्सिंगच्या नियामाचे सुद्धा पालन करण्यात आल्याचे वधू-वरांनी सांगितले आहे.(Coronavirus:मुंबईतील दाट लोकवस्तीच्या भागात लॉकडाउनच्या आदेशाचे कठोर पालन करण्यासाठी ड्रोन नजर ठेवणार-राजेश टोपे)

भारतात विवााहसोहळा अगदी धुमधडाक्यात पार पाडला जातो. मात्र लॉकडाउनचे आदेश असल्याने आम्ही त्या पद्धतीने न करण्याचे ठरवले. तसेच लॉकडाउन अधिक काळ वाढू शकतो अशा अफवा परसत असल्याने आम्ही त्या आधीच लग्न उरकले असल्याचे कपल्स यांनी म्हटले आहे. या लग्नासाठी आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेऊन प्रतिज्ञापत्र तयार करुन घेतले. त्यानंतर आम्ही मंदिरात मास्क घालून विवाह पार पाडला.

दरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आल्याने काही परिसर सील करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात आणखी 16 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आकडा 1380 वर पोहचला आहे. ही संख्या खूपच धक्कादायक असून दिवसेंदिवस महाराष्ट्रातील स्थिती गंभीर बनत चालली आहे. तर भारतात 547 नव्या रुग्णांसह आज कोरोना बाधितांची एकूण संख्या 6412 इतकी झाली आहे. यात गेल्या 12 तासांमध्ये 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या खूपच धक्कादायक असल्याचे आरोग्य मंत्रलायाकडून सांगण्यात येत आहे.