Maharashtra Police (Photo Credits: Twitter/ ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊन (Lockdown) काळात नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी आतापर्यंत (Maharashtra Police) तब्बल 60,005 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील 13,381 जणांना अटकही करण्यात आली आहे. ही आकडेवारी 22 मार्च 2020 ते 21 एप्रिल 2020 पर्यंतच्या दुपारी 4 वाजेपर्यंतची आहे. कायदा मोडणाऱ्या वाहन चालकांकडून आतापर्यंत 41,768 वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. COVID-19 विषाणूला नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. या प्रयत्नाचा भाग म्हणून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

पोलिसांवह हल्ले केलप्रकरणी 411 जणांवरही गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही लॉकडाऊन आहे. कोरोना व्हायरस म्हणजेच कोविड 19 या विषाणूवर अद्यापही कोणतीही लस अथवा औषध उपलब्ध नाही. त्यामुळे सोशल डीस्टन्सींग हाच यावर एकमेव उपाय आहे. त्यामुळे लॉकडाऊन नियमावली अधिकअधिक कडक केली जात आहे. (हेही वाचा, मुंबई: गोरेगाव मध्ये महिला पोलिस कर्मचारीची आत्महत्या; Lockdown मुळे कुटूंबियांस सांगलीहून येण्याची परवानगी नाकारल्याने नाराजीचा सूर)

एएनआय ट्विट

दरम्यान, लॉकडाऊन नियमावली अधिक कडक केले आहेत. त्याची अंमलबवणीही काटेकोरपणे करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकदा नागरिक आणि पोलीस कर्मचारी यांच्यात मोठ्या प्रमाणावर संघर्ष होताना पाहायला मिळत आहे. अनेकदा नागरिक कायदा मोडत आहेत. त्यावर पोलीस विनंती करुन कायदा पाळण्याबाबत सांगत आहेत. मात्र असे असूनही नागरिक मात्र कायदा मोडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करावी लागत आहे.