देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउनचे आदेश वाढवण्यात आले आहेत. या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार असल्याचे म्हटले आहे. मात्र काही ठिकाणी चोरीछुप्या रितीने दारु, सिगरेट विकत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. याच पार्श्वभुमीवर आता पुणे (Pune) येथे लॉकडाउनच्या काळात सिगरेट विकाणाऱ्या व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या व्यापाऱ्याकडून 39 लाखांचे सिगरेट जप्त करण्यात आले आहेत. सध्या लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नागरिकांना केला जात आहे.
पुण्यातील मार्केट यार्ड येथील एका दुकानात जीवनावश्यक वस्तू नागरिकांना दिल्या जात होत्याय. पण त्याचसोबत सिगरेटची सु्द्धा विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांनी काढली. त्यानंतर पोलिसांनी दुकानावर धाड टाकत व्यापाऱ्याला अटक करण्यात आले आहे. याच्याकडून 37 सिगरेटचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या बॉक्सची किंमत जवळजवळ 39 लाखांच्या घरात असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.(मुंबई: धारावी येथे गुन्हे शाखेकडून धाड टाकत तब्बल 12,15,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत 81 हजार त्रिस्तरीय सर्जिकल मास्क जप्त, एकाला अटक)
दरम्यान, मुंबईत आज नवे 183 रुग्ण आणि 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत आतापर्यंत 1936 कोरोनाबाधित रुग्ण आणि 113 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 181 जणांचा आता पर्यंत डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. तर धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा 30 पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण आणि 3 पेक्षा अधिक जणांचा मृत्यु झाला आहे.तर महाराष्ट्रात आज 232 कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2916 वर पोहचल्याची माहिती देण्यात आली आहे.