Rajesh Tope (Photo Credits: ANI)

रॅपिड टेस्ट (Rapid Coronavirus Diagnostic Test) करण्यासाठी राज्याला केंद्र सरकारकडून (Central Government) परवानगी मिळाली आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कोरोना व्हायरस झाला आहे किंवा नाही हे अवघ्या 5 मिनिटांत समजू शकणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope) यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या संवादानंतर त्याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांमध्ये कोरोना व्हायरस संक्रमणाबातच्या चाचण्या अधिक प्रमाणात होणे आवश्यक आहे. आपल्याकडे तब्बल 5 हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे. परंतू, त्यासाठी आवश्यक असलेली रॅपीट टेस्ट करण्याची राज्याला मान्यता नव्हती. मात्र आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारला ही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे राज्य सरकारसमोरचा मोठाच प्रश्न निकाली निघाली आहे. आता कोणत्याही व्यक्तिला कोरोना झाला आहे किंवा नाही हे अवघ्या पाचच मिनिटात समजू शकते, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

रॅपीड टेस्ट करण्याचा फायदा काय?

रॅपीड टेस्टच्या माध्यमातून रुग्णाचे स्क्रिनिंग करण्यात येते. त्यासठी रक्ताचा नमुना घ्यावा लागतो. हे स्क्रिनिंग केल्याने संबंधित व्यक्तिला कोरोना व्हायरस लागण झाली आहे किंवा नाही याबाबत अवघ्या काही मिनिटांतच माहिती मिळू शकते. शरीरात तयार झालेल्या रोगप्रतिकारकाच्या प्रमाणावरुन हे निश्चित केलं जातं. (हेही वाचा, Coronavirus: देशभरात कोरोना व्हायरस बाधित 12 रुग्णांचा 24 तासात मृत्यू; धारावी येथील 300 घरं 19 दुकानं क्वारंटाईन - केंद्रीय आरोग्य मंत्रालय)

दरम्यान, कोरना व्हायरस लागण झालेल्या रुग्णांची नक्की संख्या समजल्यास त्या रुग्णांचे विलगीकरण करुन त्यांच्यावर उपचार सुरु केले जातील. ज्यामुळे कोरोना व्हायरस संकट नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक स्वतंत्र रुग्णालय दिले जाईल, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.