Dharavi

मुंबई येथील धारावी (Dharavi Slum) परिसरात कोरोना व्हायरस (Coronaviru) बाधा झालेल्या एका व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर हा व्यक्ती राहात असलेली इमारत सील करण्यात आली आहे. तसेच धारावी परिसराती सुमारे 300 घरं आणि 19 दुकानं क्वारंटाईन करण्यात आली आहेत. कोरोना व्हायरस विरोधातील लढाई सुरु झाली आहे. मुंबई शहरात सुमारे 4 हजार आरोग्य सेवक कार्यरत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय ((Union Health Ministry)) सचिव लव अगरवाल (Lav Aggarwal, Joint Secretary, Health Ministry) यांनी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते बोलत होते.

लव अग्रवाल यांनी माहिती देताना सांगितले की, संपूर्ण देशात गेल्या 24 तासात 328 नव्या कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोना व्हायरस बाधित 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोना व्हायरस बाधित एकूण रुग्णांची एकूण संख्या 1965 इतकी झाली आहे. कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचा देशभरातील आतापर्यंतचा एकूण आकडा हा 50 इतका आहे. दिलासादायक वृत्त असे की, कोरोना व्हायरस संसर्ग झालेल्या 151 रुग्णांना आतापर्यंत उपचारांनी बरे करण्यात यश आले आहे.

दरम्यान, देशभरात N95 मास्क तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सरकारने 1.5 कोटी पेक्षाही अधिक पीपीई (Personal protective equipment) साठी ऑर्डर दिली आहे. ज्याची लवकरच पूर्तता होईल. पीपीई राज्यांमध्येही पाठवले जात आहेत. याशिवाय 1 कोटी पेक्षाही अधिक N95 मास्क पूरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एएनआय ट्विट

पुढे बोलताना अग्रवाल यांनी सांगितले की, देशबरात तब्लीगी जमात संबंधि जोडल्या गेलेल्या लोकांपैकी 400 लोक कोरोना व्हायरस बाधित आढलले आहेत. तब्लीगी जलशात सहभागी झालेल्या 1804 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोना विरुद्धची लढाई अद्यापही सुरुच आहे. आम्ही सर्वांनी सरकारने आणि आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. यात सर्व जाती धर्मांच्या आणि देशातील नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. सोशल डिस्टन्सींग काळजीपूर्वक पाळलेच गेले पाहीजे. ते न पाळणे म्हणजे लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन आहे, असेही अग्रवाल यांनी या वेळी सांगितले. ळी म्हणाले.