Coronavirus: मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनाचे रुग्ण पळून जाण्याचे प्रकारही घडले आहेत. अशातचं आता कोरोनाच्या एका रुग्णाने 'सेव्हन हिल्स' रुग्णालयात (Seven Hill Hospital) आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णाने केलेली ही पहिली आत्महत्या आहे.
मुंबईच्या अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोना झाल्याने भरती झालेल्या 60 वर्षीय कोरोना रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या आपली जीवनयात्रा संपवली आहे. या रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णाच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. (हेही वाचा - Coranavirus in Maharashtra: मुंबई, ठाणे, पुणे शहरांत कोरोनाचा वाढता विळखा; पहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी)
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचे रुग्ण पळून जाण्याचे प्रकार मुंबईत घडले आहेत. त्यातच आता कोरोनाच्या एका रुग्णाने सेव्हन हिल रुग्णालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णाने केलेली ही पहिली आत्महत्या आहे.
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) May 9, 2020
केंद्र तसेच राज्य सरकारकडून नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. तसेच कोरोनाला न घाबरता कसं सामोरं जायचं यासंदर्भातही सरकार वेळोवेळी सुचना देत आहे. मात्र, आज कोरोना बाधित रुग्णाच्या आत्महत्येमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सध्या मुंबईमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 12 हजार पेक्षा जास्त आहे. तसेच महाराष्ट्रात 19063 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 3470 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 14862 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 731 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.