Coranavirus in Maharashtra: मुंबई, ठाणे, पुणे शहरांत कोरोनाचा वाढता विळखा; पहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी
Coronavirus Outbreak | Representational image (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणू भारतभर आपली व्याप्ती वाढवत आहे. कोरोना रुग्णांची दिवसागणित वाढत असणारी संख्या सरकार समोरील आव्हानं वाढवत आहे. दरम्यान महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारवरील जबाबदारी ही अधिक आहे. महाराष्ट्रातील 36 पैकी 34 जिल्हे कोरोना विषाणूच्या कचाट्यात सापडले आहेत. महाराष्ट्राच्या मुंबई, पुणे, ठाणे या महत्त्वाच्या शहरांमध्ये रुग्ण संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. सध्या महाराष्ट्रात 19063 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 3470 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 14862 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 731 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रीन, ऑरेंज, रेड झोननुसार राज्यात सेवा-सुविधांसाठी सवलत देण्यात आली आहे. मात्र कन्‍टेन्मेंट झोनमधील बंधने कायम आहेत. महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यातील कोरोना हॉटस्पॉट मध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान मे अखेर पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

कोरोना रुग्णांची जिल्हा आणि मनपा निहाय आकडेवारी ही महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आली आहे. ही आकडेवारी 8 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. (महाराष्ट्रातील काही 'कोरोना हॉटस्पॉट' मध्ये लॉकडाऊन वाढण्याची शक्यता)

COVID-19 पॉझिटीव्ह रुग्णांची जिल्हा/मनपा निहाय यादी:

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 12142 462
2 ठाणे 101 2
3 ठाणे मनपा 724 8
4 नवी मुंबई मनपा 716 4
5 कल्याण डोंबिवली मनपा 284 3
6 उल्हासनगर मनपा 15 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 21 2
8 मीरा भाईंदर 192 2
9 पालघर 46 2
10 वसई विरार मनपा 194 9
11 रायगड 81 1
12 पनवेल मनपा 132 2
ठाणे मंडळ एकूण 14648 497
1 नाशिक 47 0
2 नाशिक मनपा 60 0
3 मालेगाव मनपा 450 12
4 अहमदनगर 44 2
5 अहमदनगर मनपा 9 0
6 धुळे 8 2
7 धुळे मनपा 24 1
8 जळगाव 82 12
9 जळगाव मनपा 14 2
10 नंदुरबार 19 1
नाशिक मंडळ एकूण 757 32
1 पुणे 110 4
2 पुणे मनपा 1938 132
3 पिंपरी-चिंचवड मनपा 129 3
4 सोलापूर 6 0
5 सोलापूर मनपा 179 10
6 सातारा 94 2
पुणे मंडळ एकुण 2456 151
1 कोल्हापूर 10 1
2 कोल्हापूर मनपा 6 0
3 सांगली 32 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 3 1
5 सिंधुदुर्ग 5 0
6 रत्नागिरी 17 1
कोल्हापूर मंडळ एकूण 73 3
1 औरंगाबाद 5 0
2 औरंगाबाद मनपा 418 12
3 जालना 12 0
4 हिंगोली 58 0
5 परभणी 1 1
6 परभणी मनपा 1 0
औरंगाबाद मंडळ एकूण 495 13
1 लातूर 25 1
2 लातूर मनपा 0 0
3 उस्मानाबाद 3 0
5 बीड 1 0
6 नांदेड 3 0
7 नांदेड मनपा 29 2
लातूर मंडळ एकूण 61 3
1 अकोला 9 1
2 अकोला मनपा 112 9
3 अमरावती 4 1
4 अमवरावती मनपा 76 10
5 यवतमाळ 95 0
6 बुलढाणा 24 1
7 वाशीम 1 0
अकोला मंडळ एकूण 321 22
1 नागपूर 2 0
2 नागपूर मनपा 210 2
3 वर्धा 0 0
4 भंडारा 1 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 1 0
7 चंद्रपूर मनपा 3 0
8 गडचिरोली 0 0
नागपूर मंडळ एकूण 218 2
1 इतर राज्य 34 8
एकूण 19063 731

भारतातील कोविड 19 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 59662 इतकी झाली आहे. तर 17846 रुग्ण कोरोना संसर्गातून रिकव्हर झाले असून 39834 रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. तर 1981 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान देशातील रिकव्हरी रेट 29.9% इतका असून हे नक्कीच चांगले संकेत असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.