Coronavirus In Mumbai Updates: मुंबईत कोरोनाचे आणखी 2256 रुग्ण आढळले असून 31 जणांचा आज बळी गेल्याची BMC ची माहिती
Coronavirus Outbreak (Photo Credits-IANS)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. याच दरम्यान आता कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईक आज नव्याने 2256 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तसेच 31 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तर शहरात सध्या कोरोनाचे एकूण 31,063 अॅक्टिव्ह रुग्ण असून 1,32,349 जणांची प्रकृती सुधारली आहे. तसेच एकूण 8178 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.(Coronavirus In Maharashtra Police: महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 311 जणांना कोरोनाची लागण तर 5 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू)

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पुणे आणि औरंगाबाद येथे सुद्धा कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. या ठिकाणी कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी उपयायोजना करण्यात येत आहेत. तसेच कंन्टेंटमेंट झोन वगळून अन्य ठिकाणी अनलॉक-4 नुसार काही गोष्टी सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण सिनेमागृह, नाट्यगृह, जलतरण तलाव, जिम, मेट्रो, धार्मिक स्थळांसह मंदिरे बंदच ठेवली आहेत.(My Family My Responsibility Campaign: माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम परिणामकारकपणे राबवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश)

कोरोनाचे संकट अजून किती काळ कायम राहिल याबद्दल सांगता येत नाही. पण नागरिकांनी सध्याच्या काळात स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी आणि नियमांचे पालन करावे असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. कोरोनावर अद्याप ठोस औषध उपलब्ध नसून त्याच्या संबंधित औषधावर जगभरातील संशोधकांकडून अभ्यास केला जात आहे. कोविड योद्धे सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोख रितीने पार पाडताना दिसून येत आहेत.