Maharashtra Police (Photo Credit: Twitter)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता राज्यात गेल्या 14 तासात पोलीस दलातील आणखी 311 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 5 जणांनी आपला कोरोनामुळे जीव गमावल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलीस दलात सध्या एकूण 19,385 जण कोरोनाग्रस्त असून 3670 अॅक्टिव्ह रुग्ण आणि 15,521 जणांची प्रकृती सुधारली आहे. तसेच 194 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.(Coronavirus Update: महाराष्ट्रात पुणे, मुंबई नंतर 'या' जिल्ह्यात आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, पाहा जिल्हानिहाय आकडेवारी)

कोरोनाचे संकट अजून किती काळ कायम राहिल याबद्दल सांगता येत नाही. पण नागरिकांनी सध्याच्या काळात स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी आणि नियमांचे पालन करावे असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. कोरोनावर अद्याप ठोस औषध उपलब्ध नसून त्याच्या संबंधित औषधावर जगभरातील संशोधकांकडून अभ्यास केला जात आहे. कोविड योद्धे सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोख रितीने पार पाडताना दिसून येत आहेत.(धक्कादायक! मुंबईतील सायन रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल झाल्याने 2 कर्मचा-यांना केले निलंबित, रुग्णाचे आधीच अन्य कुटूंबाकडून अंत्यसंस्कार झाल्याने नातेवाईकांचा आक्रोश)

दरम्यान, राज्यात आता अनलॉकिंग-4 नुसार काही गोष्टी सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण सिनेमागृह, नाट्यगृह, जलतरण तलाव, जिम, मेट्रो, धार्मिक स्थळांसह मंदिरे बंदच ठेवली आहेत. कोरोनाची एकूणच राज्यातील परिस्थिती पाहता मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि औरंगाबाद येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात काल दिवसभरात 22,543 नवे रुग्ण आढळले असून 416 रुग्णांचा मृत्यू (COVID-19 झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे राज्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 10 लाख 60 हजार 308 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे राज्यात मागील 24 तासांत 11,549 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 7,40,061 रुग्णांनी कोरोनावर  यशस्वीरित्या मात केली आहे.