Sion Hospital Case (Photo Credits: Twitter/ANI)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) रुग्णसंख्येत होणारी वाढ तर दुसरीकडे रुग्णालयात रुग्णांच्या मृतदेहांची अदलाबदली करण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. यामुळे मुंबईच्या सायन रुग्णालयात (Sion Hospital) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे रुग्णांच्या शवांची अदलाबदल केल्यामुळे एका रुग्णाच्या मृतदेहाचे दुस-याच कुटूंबाकडून अंत्यसंस्कार झाल्याने त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला आहे. हा सर्व प्रकार मुंबई महापालिकेच्या लक्षात येताच त्यांनी रुग्णालयातील 2 कर्मचा-यांचे निलंबन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायन रुग्णालयात एक रोड अपघातात जखमी झालेल्या रुग्णावर उपचार सुरु होते. ज्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयात जेव्हा त्याचे नातेवाईक त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास आले तेव्हा त्यांना त्यांच्या माणसाचा मृतदेह हा दुस-या मृतदेहासोबत बदलण्यात आल्याचे समजले. ठाणे पलिका रूग्णालयामध्ये गायकवाड-सोनावणे कोरोना रूग्णांच्या मृतदेहांची अदलाबदल; एका कुटुंबाला दोनदा करावे लागले अंत्यविधी; प्रशासनाचे चौकशी करून कारवाईचे आदेश

घडलेला प्रकार खूपच धक्कादायक असल्याचे कळताच त्या मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. इतकच नव्हे अधिक तपासात अशीही माहिती समोर आली त्या रुग्णाचे कोणत्यातरी अन्य मृताच्या कुटूंबियांनी अंत्यसंस्कार देखील केले. यामुळे झालेल्या घटनेचे दखल घेत BMC ने रुग्णालयातील 2 कर्मचा-यांना निलंबित केले आहे. त्याचबरोबर या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार ठाण्यात घडला होता. ठाण्यामध्ये पालिकेच्या एका हॉस्पिटलमध्ये मृतदेहाची अदलाबदल झाल्याने एका कुटुंबावर दोनदा अंत्यसंसकार करण्याची वेळ आल्याची घटना समोर आली होती.