देशभरासह राज्यात कोरोन व्हायरसने सुरुवाती पासूनच थैमान घालण्यास सुरुवात केली होती. मात्र आता महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा वेग मंदावला आहे. परंतु बहुतांश जणांनी जगभरासह देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या उलट राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची कमी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. त्याचसोबत जरी दुसरी लाट आल्यास राज्य सरकार त्याला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे ही राजेश टोपे यांनी सांगितले आहे,
राज्यात लॉकडाऊन हळूहळू उठवला जात आहे. तसेच अनलॉकच्या विविध टप्प्यांनुसार आता काही गोष्टी सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र कोरोनाचे संकट अद्याप असून नागरिकांनी नियम आणि अटींचे पालन करावे अशा सुचना दिल्या आहेत. तसेच राज्यात मंदिराचे दरवाजे पुन्हा एकदा सुरु करण्याबद्दल दिवाळी नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन घेतला जाणार आहे.(Coronavirus: अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह इतर 45 जणांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार; कोरोना काळात दिला होता मदतीचा हात)
दरम्यान, आजपासून मुंबईत 244 ठिकाणी कोरोना व्हायरसची चाचणी फ्री मध्ये केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना या चाचणीसाठी आता शुल्क मोजावे लागणार नाही आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना स्थानिक वॉर्ड वॉर रूमवर किंवा 1916 वर कॉल करू शकतात किंवा आपल्या घराजवळील जवळील चाचणी केंद्र जाणून घेण्यासाठी ऑनलाईन तपासू शकतात. अशा चाचणी केंद्रांची संख्या 300 वर घेऊन जाण्याचा मानस आहे. जवळपास 54 खासगी प्रयोगशाळा होम सर्विशसह या चाचण्या देत आहेत. सुरुवातीला ही सुविधा सर्व नागरी प्रभागांमधील विविध नागरी दवाखाने व रुग्णालयांमध्ये, सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत जाण्यासाठी उपलब्ध असणार आहे.