Representational Image (Photo Credits: IANS)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्च पासून पुढील 21 दिवसांसाठी देशात लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान काल रात्री 8 च्या नंतर ही घोषणा केल्यानंतर नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी झुंबड केली होती. सांगलीमध्ये मंडईत एकत्र जमून नागरिकांनी भाजी खरेदीसाठी अनावश्यक गर्दी न करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये भाजीपाला, दूध यासारख्या अत्यावश्यक गोष्टी नागरिकांना मिळाव्यात म्हणून प्रशासनाकडून ते घरपोच देण्यासाठी खास सोय करण्यात आली आहे. ही सोय सांगली, मिरज आणि कूपवाड या भागातील नागरिकांना मिळणार आहे. त्याचे काही संपर्क क्रमांक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे अवघ्या एका फोन कॉलवर नागरिकांना मदत मिळणार आहे.यामध्ये दूध, भाजीपाला, औषधं आणि इतर सेवेसाठी खास सोय आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्यासमवेत घरात बसून लोकांमध्ये केली जनजागृती; व्हिडिओ व्हायरल.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचे आदेश दिले असले तरीही नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा सुविधा देणारी सारी दुकानं खुली राहणार आहे. मात्र नागरिकांना खरेदी करताना एकमेकांमध्ये विशिष्ट अंतर ठेवण्याचं आवाहन करण्यात आला. कोरोना व्हायरसचं संकट आता आपल्या उंबरठ्यापाशी आलं आहे त्याला तेथूनच परतवण्यासाठी आता नागरिकांच्या संयमची परीक्षा आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. Total Lockdown in India: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवस लॉकडाऊन, 'या' सुविधा राहणार सुरू; जाणून घ्या संपूर्ण यादी.  

ANI TWEET

जगभरात थैमान घालणारं कोरोना व्हायरसचं संकट भारतामध्येही दाखल झाले आहे. देशात कोरोनाचे 512 रूग्ण आहेत. तर 9 जणांनी जीव गमावला आहे. आज (25 मार्च) सकाळी 9 वाजेपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे 98 भारतीय तर 3 परदेशी नागरिक उपचार घेत आहेत. तर 2 जणांचा बळी गेला आहे.