Coronavirus: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील जनतेने कठोर निर्बंधासाठी तयार रहावे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इशारा
Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

Coronavirus: राज्यात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर प्रशासनाकडून सुद्धा कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता सध्या लॉकडाऊन बद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहे. पण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णांचा आकडा वाढत असल्याने जनतेने कठोर निर्बंधासाठी तयार रहावे असा सुचक इशारा दिला आहे.(Engineer Commits Suicide In Pune: नोकरी गेल्याचे नैराश्य आणि पबजी गेमच्या नादातून अभियंत्याची आत्महत्या)

राजेश टोपे यांनी नागरिकांनी गर्दी करण्याचे टाळावे असे म्हटले आहे. तर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याऐवजी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर कोणत्या उपाययोजना करता येईल यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.गर्दी टाळणे हाच निर्बंधाचा मुख्य हेतू असल्याचे टोपे यांनी सांगितले आहे. तर गर्दीच्या काही ठिकाणी कमीत कमी गर्दी व्हावी  त्यासाठी सुद्धा नियोजन करण्यात येत आहे. याबद्दलचा अंतिम निर्णय झाल्यानंतर त्या संदर्भातील अधिक माहिती दिली जाणार आहे. मात्र नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करण्याच्या दृष्टीकोनातून पुढील पावले उचलली जाणार आहेत. परंतु जर नागरिकांकडून निष्काळजीपणाने वागणूक केली जाणार असेल तर नियम अधिक कठोर करावे लागतील असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. (Lockdown in Aurangabad: औरंगाबाद मधील 10 दिवसांचा लॉकडाऊन रद्द)

दरम्यान, राज्यातील विविध ठिकाणी संचारबंदी आणि लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला मुंबईत सुद्धा कोरोनाचे रुग्ण अधिक वाढत असल्याने येत्या 15 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत ही संचारबंदी कायम असणार आ तरराज्यात मागील 24 तासांत 27,918 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 139 जणांचा मृत्यू झाला आहे. 23,820 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.