महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यात आजच्या दिवसात तब्बल 288 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 7 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 3204 वर पोहचला आहे. तर मृतांची संख्या 194 इतकी आहे. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या नव्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 3000 च्या पार गेली आहे. 3000 कोरोना बाधित रुग्ण असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावानुसार राज्यातील जिल्ह्यांची रेड, ग्रीन, ऑरेंज या तीन रंगात विभागणी करण्यात आली आहे. तसंच रुग्णांच्या संख्येवरुन कोरोनाचे हॉटस्पॉट ठरवण्यात आले आहे. तसंच वाढता धोका टाळण्यासाठी वैद्यकीय सेवांसह नागरिकांना योग्य ती माहिती मिळण्यासाठी टोल फ्री नंबर्स, वेबसाईट्स सज्ज आहेत. (Coronavirus: फक्त एक फोन करा! COVID-19 बाबतची शंका घरबसल्या दूर करा)
ANI Tweet:
288 more #COVID19 cases & 7 more deaths reported in Maharashtra. Total coronavirus cases in the state stand at 3,204 and deaths at 194: State Health Department
— ANI (@ANI) April 17, 2020
कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे देशभरातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र राज्यात ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे त्या ठिकाणी काही सुविधा सुरु करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
COVID-19 Update: महाराष्ट्रात २८८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; रुग्णांचा आकडा पोहचला ३२०५ वर : Watch Video
देशातील कोरोना बाधितांचा आकडा 13000 च्या पार गेला असून 437 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना आपले प्राण गमावले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवत आहे. परंतु, देशातील 1749 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत ही नक्कीच दिलासादायक बाब आहे.