मुंबई पोलिस खात्यामध्ये 250 जणांना कोरोनाची लागण, कुणीही ICU मध्ये नाही: पोलिस कमिशनर परम बिर सिंग यांची माहिती
Mumbai Police (Photo Credit: PTI)

कोव्हिड 19 च्या जीवघेण्या विळख्यात मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबतच मुंबई पोलिस देखील अहोरात्र मेहनत आहेत. त्यामुळे आता मुंबई पोलिसांमध्येही कोरोनाची बाधा होण्यास सुरूवात झाली. आज (7 मे) मुंबई पोलिस कमिशनर परमबीर सिंह ( Param Bir Singh) यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्य माहितीनुसार आत्तापर्यंत सुमरे 250 पोलिस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी कोरोनाची लक्षणं दिसणारे अत्यंत कमी आहेत. तर कोणताही कोरोनाबाधित पोलिस कर्मचारी आयसीयूमध्ये दाखल नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान मुंबई शहराने काल 10 कोरोनाग्रस्तांचा 10 हजार रूग्णांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे दिवसागणिक वाढणारी कोव्हिड 19 आजाराची भीती आता वाढायला लागली आहे. Coronavirus: 'काही टेंशन घेऊ नको रे, मित्रा!' COVID-19 पॉझिटीव्ह सहकाऱ्याला जेव्हा Mumbai Police देतात भावनिक आधार; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही शेअर केला व्हिडिओ.

दरम्यान पोलिस खात्याकडून काही दिवसांपूर्वीच 50 वर्षांवरील आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, हद्यविकार असा त्रास असणार्‍यांना बंदोबस्ताच्या ड्युटी न लावण्याचे आदेश देण्यात आले आहे. सध्या 50 वर्षावरील पोलिस कर्मचार्‍यांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या 3 पोलिस कर्मचार्‍यांची कोरोना विरूद्धची लढाई काही दिवसांपूर्वीच अयशस्वी ठरल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पोलिस कर्मचार्‍यांसाठी गृह खात्याने काही मुभा दिल्या आहेत. महाराष्ट्रात पोलीस दलातील 487 कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह

ANI Tweet 

काही दिवसांपूर्वीच दक्षिण मुंबईमध्ये जेजे मार्ग पोलिस स्थानकातील 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. सध्या महाराष्ट्रात पोलीस दलातील 487 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.