देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन नुसार विभागणी करण्यात आली आहे. राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र सरकारने लॉकडाउनचे नियम काही ठिकाणी शिथिल केल्यानंतर नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडवल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. नागरिकांना घराबाहेर पडू नका असे वारंवार सांगून सुद्धा ऐकत नाही आहेत. परिणामी पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पोलीस कर्मचारी ही वैद्यकिय कर्मचाऱ्यांसारखेच अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. याच दरम्यान आता पोलीस दलातील 487 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
राज्यात विविध ठिकाणी लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यानुसार कलम 188 अंतर्गत 96,231 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 53,330 वाहने जप्त आणि 18,858 जणांना अटक केली आहे. तर 189 जणांना पोलिसांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ऐवढेच नाही तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 3,56,81,994 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली आहे.(Lockdown: मनसे नेते अमित ठाकरे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन; लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांबाबत चर्चा)
487 police personnel have tested positive for COVID-19 since the lockdown.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 7, 2020
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आतापर्यंत 2,24,219 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर 649 जणांना क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. राज्य सरकारकडून 4,35,030 स्थलांतरित कामगारांसाठी 4,738 रिलिफ कॅम्पस उभारण्यात आले असून त्यांना अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तू पुरवल्या जात आहेत. आतापर्यंत 1281 बेकायदेशीर पद्धतीने वाहतूक केल्याने गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. तर गेल्या दोन दिवसात 700 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.