महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र, मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याशी फोनद्वारे चर्चा झाल्याचे वृत्त आहे. पुण्यामध्ये स्पर्धा परिक्षांमुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाण्याची तात्काळ सोय करण्यात यावी यासाठी अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन संवाद साधला. @Mpsc_Andolan या ट्विटर हँडलवरुन Mpsc समन्वय समिती महाराष्ट्र राज्य या ट्विटर यूजर्सने ट्विटद्वारे ही माहिती दिली. @mnsadhikrut या ट्विटर हँडलवर 'MNS Adhikrut - मनसे अधिकृत' या नावाने ट्विटरवर असलेल्या मनसेने Mpsc समन्वय समितीचे हे ट्विट रिट्विटही केले आहे.
पुणे येथे स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. लॉकडाऊनमुळे बहुसंख्य विद्यार्थी हे पुण्यातच अडकले आहेत. या विद्यार्थ्यांनी अमित ठाकरे याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अमित ठाकरे यांनी काल (बुधवार, 6 मे 2020) रात्री 10 वाजता मुख्यमंत्र्यांशी फोनद्वारे संवाद साधला. या संवादात अमित यांनी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुद्दा मांडला. (हेही वाचा, CM Relief Fund: मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 मदत करण्यासाठी आवश्यक माहिती, बँक खाते क्रमांक, पोचपावती, पद्धत)
दरम्यान, लॉकडाऊनमुळे राज्याच्या विविध ठिकाणी अडकलेल्या सर्व विद्यार्थी, मजूर, नागरिकांना आपापल्या जिल्ह्यातील गावांमध्ये जाण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून एसटी बसेसमार्फत मोफत सेवा दिली जाईल, अशी माहितीही मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कालच (बुधवार, 6 मे 2020) दिली होती.