CM Relief Fund: मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 मदत करण्यासाठी आवश्यक माहिती, बँक खाते क्रमांक, पोचपावती, पद्धत
CM Relief Fund | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Maharashtra Chief Minister Relief Fund-COVID 19: कविड-19 (COVID-19) अर्थातच कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) काळात घरी थांबून आपण या युद्धात महत्त्वाची भूमिका निभावत आहातच. यासोबतच मुख्यमंत्री सहायता निधी (CM Relief Fund) मध्ये आपले आर्थिक योगदान देऊनही आपण आणखी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकता. आपला खारीचा वाटा उचलू शकता. कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात मदत करण्यासाठी आपणास योगदान द्यायचे असल्यास पुढील माहिती जरूर वाचा.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कशासाठी?

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधी ( cmrf.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, ''महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी' मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.

मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) बँक खात्याबद्दल माहिती

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधी ( cmrf.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक स्थळे राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व नागरिकांनी “मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19)” या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात आपली रक्कम जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाने केली आहे. (हेही वाचा, Coronavirus: मुंबई उच्च न्यायालय आजी-माजी न्यायाधीश, कर्मचारी; राज्यातील जनता, ज्येष्ठ नागरिक, संस्थांकडून मुख्यमंत्री सहायता निधित 314 कोटी रुपयांची रक्कम जमा)

मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) बँक खाते क्रमांक आणि तपशील

Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Saving Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch, Fort Mumbai 400023

Branch Code 00300

IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-

मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड 19

बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720

स्टेट बँक ऑफ इंडिया,

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023

शाखा कोड 00300

आयएफएससी कोड SBIN0000300

केलेल्या मदतीची पोचपावती कशी घ्याल?

मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) मध्ये वरील बँक खात्यात रक्कम दिल्यानंतर त्याबाबतची पोचपावती आपण जरुर घेऊ शकता. त्यासाठी आपण दिलेल्या देणगीची पोचपावती देण्यासाठी आपले पूर्ण नाव, बँकेचे नाव, दिनांक, रक्कम व UTR / Transaction ID याबाबींची माहिती सरकारला देणे आवश्यक असते. ही माहिती आपण donationscmrf-mh@gov.in या ईमेलवर पाठवावी. या इमेल आडीवर पाठवलेल्या माहितीनुसार खातरजमा करुन राज्य सरकार आपल्याला मदतीची पोच पावती देईल.

दरम्यान, प्रत्यक्ष बँकेत जाऊन रोख रक्कम अथवा चेक चमा करु शकता. तसेच ऑनलाईन (Online) पद्धतीनेही आपण मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) मध्ये आपली मदत पोच करु शकता. Online पद्धतीने मदत करताना आपण Debit Card ,Credit Card याचा वापर करु शकता. तसेच RTGS,NEFT या मार्गाचाही वापर करु शकता. याशिवाय Phonepe, Paytm,Gpay तसेच सर्व upi Enabled applications आणि QR code आदींचा वापर करुनही आपण मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) मध्ये आपली मदत जमा करु शकता.