मुंबई पोलीसांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे त्याला रुग्णवाहीकेतून उपचारासाठी घेऊन जात असताना मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील त्याचे सहकारी त्याला निरोप देतात. या वेळचा हा व्हिडिओ आहे. 'काही टेंशन घेऊ नको रे, मित्रा!' तुझ्या पाठिमागे आम्ही खंबीर उभे आहोत, असे सांगत हे सहकारी त्याला भावनिक साद घालतात. मुंबई पोलिसांनी ट्विटर हँडलवर पोस्ट केलेला हा व्हिडिओ राज्याचे पर्यावरण मंत्री (Environment Minister) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी मुंबई पोलिसांची ही पोस्ट आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर करत म्हटले आहे की, हा एक फिरता व्हिडिओ आहे. आपले शूर महिला, पुरुष इथे आपल्यासाठीच काम करत आहेत. त्यामुळे आपण घरीच थांबा, असे अवाहनही आदित्य यांनी नागरिकांना केले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील बरेच कर्मचारी कोरोना व्हायरस संक्रमित झाले आहेत. नागरिकांना कोरोना व्हायरस संक्रमनापासून दूर ठेवण्यासाठी आणि लॉकडाऊन नियमांचे पालन व्हावे यासाठी महाराष्ट्र पोलीस रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहेत. यात मुंबई पोलिसांवरील कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. दाटीवाटीची लोकवस्ती, दमट हवामान, छोट्या घरांमध्ये राहणाऱ्यांची मोठी संख्या आदींमुळे नागरिकी घराबाहेर पडत आहेत. बाजारात गर्दी करत आहेत. अशा वेळी पोलिसांना गर्दीत जाऊन काम करावे लागते आहे. (हेही वाचा, Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज 597 नवीन कोरोना व्हायरस प्रकरणांची नोंद; राज्यात एकूण संक्रमितांची संख्या 9915 वर)
मुंबई पोलीस, आदित्य ठाकरे ट्विट
This is a moving video! These brave women and men are standing out there for us! Stay home for them! https://t.co/qcNXC9xR2D
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 29, 2020
नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळले. तसेच, सोशल डिस्टंन्सीगचा योग्य वापर केला तर, गर्दी टाळली जाणार आहे. परिणामी नागरिकांना कोरोना व्हायरस संक्रमनाचा धोका कमी होणार आहे. इतकेच नव्हे तर पोलीस कर्मचारी आणि राज्यातील अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारीच नव्हे तर, इतरांचाही कोरोनापासून बचाव होणार आहे. पण, हे सर्वसामान्य जनतेने मनावर घेतले तरच शक्य होणार आहे.