Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज 597 नवीन कोरोना व्हायरस प्रकरणांची नोंद; राज्यात एकूण संक्रमितांची संख्या 9915 वर
A child wearing a mask to get protected from coronavirus. (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रामधील (Maharashtra) कोरोना विषाणू (Coronavirus) बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज राज्यात 32 मृत्यू आणि 597 नवीन कोरोना व्हायरस प्रकरणांची नोंद झाली आहे. अशा प्रकारे राज्यात एकूण कोरोना विषाणू सकारात्मक प्रकरणे 9915 झाली आहेत, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांनी याबाबत माहिती दिली. आज एकूण 205 रुग्णांना बरे झाल्यानंतर सोडण्यात आले आहे. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण 1593 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये मुंबई येथे सर्वाधिक म्हणजे 6644 रुग्णांची नोंद झाली असून, इथे 270 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

एएनआय ट्विट -

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या धारावी येथे आज 14 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. अशाप्रकारे इथल्या एकूण संक्रमितांची संख्या 344 झाली आहे. माहीममध्ये आज कोरोना विषाणूच्या 3 नवीन रुग्णांची पुष्टी झाली आहे, दादरमध्ये कोणतेही नवीन प्रकरण आढळले नाही ही समाधानकारक बाब आहे. मुंबईत आज कोरोना विषाणूचे 26 मृत्यू आणि 475 रुग्णांची नोंद झाली आहे. अशा प्रकारे शहरातील एकूण सकारात्मक घटनांची संख्या 9532 वर पोहचली आहे.

अशा प्रकारे आजपर्यंत ठाणे मंडळात एकूण 7764 रुग्णांची नोंद व 290 मृत्यूंची नोंद झाली आहे. नाशिक मंडळात 313 रुग्ण व 27 मृत्यूंची नोंद झाली आहे. पुणे मंडळात 1309 रुग्णांची नोंद व 93 मृत्यूंची नोंद झाली आहे. कोल्हापूर मंडळात 51 रुग्ण व 2 मृत्यूंची नोंद झाली आहे, तर औरंगाबाद मंडळात 123 रुग्ण व 7 मृत्यूंची नोंद झाली आहे. (हेही वाचा: Coronavirus: मुंबई महापालिका मूल्यांकन विभागाचे निरीक्षक मधुकर हरियाण यांचे निधन)

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1 लाख 37  हजार 159 नमुन्यांपैकी,  1 लाख 26 हजार 376 जणांचे  नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. यामधील 9915 जण पॉझिटिव्ह आदळून आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 62 हजार 860 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 10 हजार 810 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.