पुणे: लॉकडाउनच्या काळात बायकोशी पंगा घेतल्यास भांडणाऱ्या नवरदेवांना करणार क्वारंटाइन
Relationship (Photo Credits: PixaBay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे सरकारकडून लॉकडाउनचे आदेश वाढवण्यात आले आहेत. मात्र लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्गाला लॉकडाउन दरम्यान घरातूनच काम करावे लागत आहे. पण सद्यच्या घडीला नवरा-बायकोमध्ये कडाक्याची भांडणे होत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभुमीवर पुणे जिल्हा परिषदेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जर तुम्ही बायकोसोबत पंगा घेतल्यास भांडणाऱ्या नवरदेवांना क्वारंटाइन करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तर नागरिकांना घरीच थांबा असे वारंवार आवाहन केले जात आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात 24 तास घरात एकत्र असलेल्या नवरा-बायकोमध्ये भांडण होत असल्याच्या घटना समोर आल्या आहे. भांडण होण्यामागे विविध कारण असू शकते. मात्र पुणे जिल्हापरिषदेने लॉकडाउनच्या काळात नवरा-बायकोत भांडण झाल्यास त्यांना प्रथम समुपदेशन करण्यात येणार आहे. मात्र तरी सुद्धा भांडण न थांबल्यास त्याला इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात लॉकडाउन दरम्यान कौंटुबिंक हिंसाचारच्या प्रकरणात वाढ झाली आहे.(Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्र राज्यात आज Covid 19 चे 288 नवे रुग्ण! राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 3,204 वर) 

यापूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा ट्वीट करत असे म्हटले होते की, लॉकडाउनमुळे जर कोणी गैरफायदा घेऊन महिलांवर अत्याचार करत असेल तर त्यांच्या विरुद्ध अतिशय कठोर कारवाई चे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

Maharashtra Lockdown : नागपूरमध्ये बेघर गरीब नागरिकांचा मेकओवर; दिले जाते उदर्निर्वाहाचे प्रशिक्षण : Watch Video 

तर लॉकडाउनच्या दरम्यान रस्त्यावर पोलीस दिवसरात्र गस्त घालून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण सुद्धा सध्या कमी झाल्याचे दिसून आले आहे.