Sewage Water Of Mumbai | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

आव्हान समजल्या जाणाऱ्या मुंबई (Mumbai) शहरात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा प्रादुर्भाव बराच आटोक्यात आला आहे. हे खरे असले तरी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) अर्थातच आयसीएमआरने दिलेल्या एका माहितीमुळे चिंता आणखी वाढली आहे. मुंबई शहरातील सांडपाण्यांमध्ये (Sewage Water Of Mumbai) कोरोना विषाणू असल्याचे आयसीएमआर म्हणतं आहे. साधारण 11 ते 22 मे 2020 या काळात मुंबईतील सांडपाण्यांचे काही नमुने आयसीएमआरने गोळा केले. या नमुन्यांच्या अभ्यासामध्ये ही बाब पुढे आल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. आयसीएमआरकडील सांडपाण्यांच्या नमुन्यांमध्ये धारावी येथील पाण्याचाही समावेश आहे.

कोरोना व्हायरस प्रादुरभाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने मुंबई शहरातील धारावी, कुर्ला, शिवाजीनगर, मालाड, कांजुरमार्ग, वडाळा या सहा ठिकाणच्या सांडपाण्याचे नमुने तपासले. हे नमुने साधारण 11 ते 22 मे 2020 या कालावधीतील आहेत. या नमुण्यांचा पृथक्करण अहवाल धक्कादायक असल्याचे पुढे आले. या पाण्यामध्ये कोरोनाचे विषाणू सापडल्याने आयसीएमआरसह सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.

दरम्यान, मुंबईतील सांडपाणी खोल समुद्रात सोडले जाते. त्यामुळे त्याचा थेट मानवाशी संपर्क येत नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. या पाण्याचा मानवाशी संपर्क येत नसल्या कारणाने या पाण्यातून मानवास कोरोना लागन होण्याची शक्यता अगदीच नगण्य असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, PCR Test Rate: महाराष्ट्रात कोरोना विषाणू चाचणी 980 रुपयांऐवजी 700 रुपयांमध्ये होणार; दरामध्ये सहाव्यांदा कपात)

दरम्यान, मुंबई आणि प्रामुख्याने धारावी परिसर हा कोरोना काळात अत्यंत आव्हानात्मक मानला गेला. धारावी परिसरातील लोकसंख्येची घनता अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे सहाजिकच हा भाग अतिशय दाटीवाटीचा आहे. दाट लोकसंख्या असलेल्या परिसरात सोशल डिस्टंन्सींग पाळणए आव्हानात्मक असते. त्यामुळे धारावी आणि मुंबई शहराकडे कोरोना काळात अधिक आव्हानात्मक नजरेने पाहिले गेले. परंतू, मुंबई महापालिकेने कोरोनाचे आव्हान अधिक समर्कपकपणे हाताळल्याचे अभ्यासक सांगतात.