कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण देशात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवाडी समोर आली आहे. यामुळे लोकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर वाड्यावस्त्या आणि झोपडपट्टी जाऊन सर्वांची आरोग्याची काळजी घेणाऱ्या एका आशा स्वयंसेविकेला साध्या खोकल्यासाठी विलगीकरणाचा शिक्का (Home Quarantine) मारला आहे. मात्र, हातावर क्वारन्टाईनचा शिक्का असल्यामुळे संबंधित महिलेचा नागरिकांनी मानसिक छळ (Harassment) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच त्यांना वाळीत टाकण्याचाही प्रयत्न करण्यात आला. ही घटना पुणे (Pune) येथील परिसरात घडली. याप्रकरणी संबंधित महिलेने स्थानिक पोलिसांत धाव घेतली. मात्र, पोलिसांनीही तिला मदत न करता पुन्हा शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले.
शहरातील न्यू बुधवार पेठेत पती व दोन चिमुकल्यांसह राहते. गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित महिला आरोग्य स्वयंसेविका म्हणून काम करत आहे. दरम्यान, या महिलेला घशाचा संसर्ग झाला. यावर तिने शासकीय रुग्णालयात जात उपचार घेतले. खबरदारी म्हणून तिला 14 दिवस ‘होम क्वोरंटीन’चा सल्ला दिला. त्यानुसार तिच्या हातावर शिक्काही मारला. तिचा हा शिक्का शेजारच्या काही महिलांनी पाहिल्यावर करोना झाल्याचा संशय घेत परिसरातील नागरिकांनी तिला दुसरीकडे जाण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे वैतागून तिने कुटुंबासह माहेरी आसरा घेतला. परंतु तिथेही तिला विरोध झाला. यानंतर तिने तुळजापूर वेशीत मावशीचे घर गाठले. तिथूनही तिला हुसकावले दिले. हे देखील वाचा- लज्जास्पद! कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथे जंतुनाशक औषधांची फवारणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना नागरिकांकडून मारहाण
कोरोना विषाणूने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी घोषीत केली होती. दरम्यान, सर्वकाही बंद ठेवून केवळ अत्यावश्यक सेवा पुरवल्या जात आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांवर नागरिकांकडून हल्ला करण्यात आलेल्या अनेक बातम्या आपल्या कानावर पडत आहेत.