Beat Representative Image (फाईल फोटो)

कोरोना विषाणुने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) थैमान घातला आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. यातच अहमदनगरमध्ये (Ahmednagar) चक्क जंतुनाशक औषध फवारणीचे काम करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच (Municipal Officers) मारहाण झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना अहमदनगर येथील एमआयडीसी परिसरात घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट वावरत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता, नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळण्याकरिता महापालिकेचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. मात्र नागरिकांकडून याच प्रशासकीय यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्याने नागरिकांसह महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त होऊ लागला आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आतापर्यंत हजारो लोकांचा जीव घेतला आहे. तर, लाखो लोक कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकले आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्याकरिता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी घोषीत केली आहे. संचारबंदीत नागरिकांना केवळ अत्यावश्यक सेवा पुरवली जात असून सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, डॉक्टर, सरकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचारी नागरिकांना अत्यावश्यक सेवा देत आहे. मात्र, देशात अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांवर हल्ला होत असल्याचे अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यातच अहमदनगर येथे औषधांची फवारणी करण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी मारहाण केली आहे. अहमदनगर येथील एमआयडीसी आणि बोल्हेगाव परिसरात औषधांची फवारणी केली जात आहे. हे देखील वाचा- दिल्लीतील निझामुद्दीन येथे जो प्रकार घडला, असे महाराष्ट्रात घडू देऊ नका; राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे राज्यातील जनतेला आवाहन

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असतानाही रुग्णांच्या संख्येत सकारात्मक बदल झाला नाही. यातच महाराष्ट्रात आणखी 3 नवे रुग्ण आढळल्याचे समजत आहे. दरम्यान, बुलढाण्यात एक तर, पुणे येथे 2 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.