Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये आज 1,228 कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. आज शहरात 62 जणांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे मुंबईमधील एकूण कोरोना  विषाणू संक्रमित रुग्णांची संख्या 98,979 अशी झाली आहे. कोरोना विषाणू रुग्णांच्या मृत्यूंची एकूण संख्या 5,582 अशी झाली आहे. सध्या शहरात 24,057 सक्रीय रुग्ण आहेत. आज शहरामध्ये 803 कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले व आतापर्यंत एकूण 69,340 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज मुंबईमध्ये 885 कोरोना संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. बीएमसीने (BMC) याबाबत माहिती दिली.

आज मृत्यू झालेल्या पैकी 55 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 43 रुग्ण पुरुष व 19 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 2 जणांचे वय 40 वर्षा खाली होते. 35 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 25 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. सध्या मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 70 टक्के इतका आहे. 11 जुलै ते 16 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.34 टक्के राहिला आहे. 16 जुलै 2020 पर्यंत झालेल्या कोविड च्या एकूण चाचण्या 4,21,345 आहेत. (हेही वाचा: महाराष्ट्रात आज 8,308 नवे कोरोना रुग्ण, तर 258 जणांचा मृत्यू; राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2,92,589 वर पोहचली)

पीटीआय ट्वीट -

सध्या मुंबईमध्ये आयसीयु किंवा व्हेंटीलेटर बेड्सची संख्या 1737/1053 आहे, तर ऑक्सिजन बेड्स (Oxygen Bed) ची संख्या 11,254 आहे. दरम्यान, मुंबईतील धारावीत आज कोरोनाचे आणखी 10 रुग्ण आढळून आल्याने संक्रमितांचा आकडा 2,438 वर पोहचला आहे. तर महाराष्ट्रामध्ये आज 8, 308 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज दिवसभरात 258 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2,92,589 इतकी झाली आहे.