Suresh Dhas | (File Image)

भाजप आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश धस (Suresh Dhas) यांनी संचारबंदी आदेश (Curfew Order) डावलून कंटेनमेंट झोन (Containment Zone) मध्ये प्रवेश केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहरामध्ये कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे अवघे शहर तणावाखाली असल्याची स्थिती आहे. अशात धस यांनी कंटेनमेंट झोनमध्ये जात तेथील नागरिकांशी संवाद साधला होता, या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

कोरोना व्हायरस संक्रमन रोखण्यासाठी आणि हे संकट दूर करण्यासाठी प्रशासन आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचा प्रयत्न करत आहे. असे असताना लोकप्रतिनीधींनी अधिक जबाबदपणा दाखवण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा, Coronavirus: शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही एक पत्र लिहावं- देवेंद्र फडणवीस)

काय आहे प्रकरण?

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात संचारबंदी आदेश लागू आहे. असे असतानाही आमदार धस यांनी या परिरात प्रवेश केला. आमदार धस यांनी उसतोड कामगारांना सोडविण्यासाठी जिल्हा बंदी आदेश डावलून प्रवेश केल्याचे पुढे आले होते.

प्राप्त माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 11 आहे. जिल्यात एका कोरोना संक्रमित महिलेला मृत्यूही झाला आहे. बीड जिल्ह्यात यापू्र्वी कोरोना व्हायरस रुग्ण आढळले नव्हते. मात्र, गेल्या काही काळात पुणे, मुंबई आणि बीड बाहेर असलेले अनेक नागरिक जिल्ह्यात परतत आहेत. त्यातील काहींना कोरोना व्हायरस संक्रमन झाल्याचे पुढे आले आहे.