Coronavirus: पुणे शहरात आणखी एका कोरोना व्हायरस बाधिताचा बळी, मृतांची संख्या नऊवर पोहोचली
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस बाधित एका 44 वर्षीय व्यक्तीचा पुणे येथे मृत्यू झाला आहे. या व्यक्तिला मधूमेह आणि इतरही काही आजार होते. या व्यक्तिच्या मृत्यूनंतर पुणे येथील कोरोना व्हायरस बाधिक रुग्णांच्या मृत्यूची संख्या तब्बल 9 इतकी झाली आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या तब्बल 147 वर पोहोचली आहे. त्यातील पुणे महापालिकेत येणाऱ्या रुग्णांची संख्या 130 तर, पिंपरी चिंचवड महापालिके असलेल्या कोरना बाधितांची संख्या 17 इतकी आहे. ही आकडेवारी 7 एप्रिल 2020 सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पुणे शहरात अनेक ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला आहे. यात खडक पोलीस ठाणे, फरासखाना पोलिस ठाणे, स्वारगेट पोलीस ठाणे, कोंढवा पोलीस ठाणे, आदी ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला आहे. कर्फ्यू लागू करण्यात आलेल्या भागात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व सेवा घेता याव्यात यासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळातच नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, सेवा घेण्यासाठी घराबाहेर पडणे बंधनकारक आहे. (हेही वाचा, Coronavirus Update: महाराष्ट्रात आणखी 150 नवे रुग्ण आढळले; राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 1018 वर)

एएनआय टविट

पुणे शहरातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या वाढल्याचे पाहून प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. त्यामुळे पुण्यात ज्या ठिकाणी कोरोना व्हायरस बाधित रुग्ण आढळले आहेत तो परीसर सील करण्यात आला आहे. तसेच, या परिसरात पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी संचारबंदी म्हणजेच कर्फ्यू लागू केला आहे. हा कर्फ्यू 14 एप्रिल पर्यंत लागू राहमार असल्याचेही रविंद्र शिसवे यांनी स्पष्ट केले आहे.