Coronavirus: नवी मुंबईत कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 974; आज दिवसभरात नव्या 64 रुग्णांची नोंद
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मुंबई शहरारप्रमाणेच नवी मुबई (Navi Mumbai) मध्येही कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या हळूहळू वाढते आहे. आज नव्या 64 रुग्णांसह नवी मुंबई शहरात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 974 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबई शहरात आज कोरोना व्हायरस संक्रमित नव्या 998 रुग्णांची नोंद झाली. मुंबई शहरातील कोरोना व्हायरस संक्रमितांचा आकडा 16579 इतका झाला आहे. त्यात मृत्यू झालेल्या 621, उपचारानंतर प्रकृती सुधारलेल्या आणि बरे वाटू लागल्याने रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) मिळालेल्या 4234 रुग्णांचाही समावेश आहे.

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता राज्यात आज 1602 नव्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 27,524 इतकी झाली आहे. आज दिवसभरात महाराष्ट्रात 44 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची मृत्यू झालेली एकूण संख्या 1019 इतकी आहे. उपचारानंतर प्रकृती सुधारलेल्या आणि बरे वाटू लागल्याने डिस्चार्ज मिलालेल्यांची संख्या 6059 इतकी आहे. सध्या रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 20,441 इतकी आहे. (हेही वाचा, Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज 1602 नविन कोरोनाबाधितांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 27,524 वर; मुंबईमध्ये 16579 संक्रमित रुग्ण)

एएनआय ट्विट

दरम्यान, भारतामध्ये कोरोना व्हायरस संक्रमित एकूण रुग्णांची संख्या 78003 इतकी आहे. त्यातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 49219 इतकी आहे. आतापर्यंत देशात कोरोना व्हायरस संक्रमित 2549 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर उपचारानंतर प्रकृती सुधारलेल्या आणि बरे वाटू लागल्यावर रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) मिळालेल्यांची संख्या 26235 इतकी आहे.