Mumbai Covid Center: Coronavirus संकट काळात उभारलेली कोविड सेंटर BMC, पुणे महापालिका करणार टप्प्याटप्प्याने बंद
COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मुंबई महापालिका (BMC) आणि पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) कार्यक्षेत्र तसेच इतर काही ठिकाणी उभारण्यात येणारी कोविड सेंटर (Covid Centres) हूहळू टप्प्याटप्प्याने बंद केली जाणार असल्याचे वृत्त आहे. राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित नव्या रुग्णांची घटती संख्या आणि कोविड सेंटर्समध्ये खाली असलेले बेड यांमुळे ही सेंटर्स बंद करण्याचा विचार सुरु असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. दरम्यान, राज्य सरकार अथवा महापालिका यांच्याकडून अधिकृतपणे याबाबत माहिती दिली नाही.

कोरोना व्हायरस संकटामुळे जगभरात उद्भवलेली स्थिती विचारात घेता महाराष्ट्रात राज्य सरकारने मोठी घबरदारी घेतली आहे. त्यातही मुंबई आणि पुणे शहरातील लोकसंख्येची घनता विचारात घेता रुग्णसंख्या अचानक वाढू शकते. हे गृहित धरुन राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली मुंबई आणि पुणे महापालिकेने मोठ्या प्रमाणावर कोविड सेंटर्स उभारली. राज्यभरातील इतरही अनेक ठिकाणी महापालिका, जिल्हापरीषदेच्या कार्यक्षेत्रात आवश्यकतेनुसार कोवड सेंटर्स उभारली आहेत. मात्र, कोरोना व्हाययरस संक्रमितांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतल्याचे समजते. तसेच, वेगवेगळ्या कोविड सेंटर्समध्ये असलेल्या रुग्णांना एकाच ठिकाणी आणण्याचा पालिकेचा विचारही सुरु असल्याचे समजते.

कोरोना व्हायरस संसर्गाचे वाढते प्रमाण पाहून मुंबई महापालिकेने हॉटेल, शाळा आणि महाविद्यालये, लग्नाची सभागृहे, खासगी इमारती, मैदाने अशा काही ठिकाणी क्वारंटाइन तर काही ठिकाणी कोविड सेंटर्स उभारली. त्यासोबतच CCC1 रूग्णांच्या उच्च-जोखीम संपर्कासाठी आणि CCC2 या विषाणूजन्य पॉझिटिव्ह रूग्णांसाठी आणि साधारण लक्षणं असलेल्या ठिकाणी पालिकेने अनेक जागा ताब्यात घेतल्या.

दरम्यान, मुंबई महापालिकने महालक्ष्मी, बीकेसी, मुलुंड, दहिसर आणि गोरेगाव आदी ठिकाणी 612 आयसीयू खाटांसह 285 खाटांची क्षमता असणारी महाकाय सेवा सुरु केली आहे. याशिवाय 7,285 खाटांपैकी 70% खाटा बीएमसीने आऊटसोर्स केल्या आहेत. सुमारे 2 हजार खाटा पालिकेच्या ताब्यात आहेत. (हेही वाचा, महाराष्ट्रात एकाच दिवसात 413 कोरोनाबाधित रुग्णांचा बळी, एकूण मृतांचा आकडा 19 हजारांच्या पार)

दरम्यान, मुंबईप्रमाणेच पुण्यातही सुमारे 21 कोविड सेंटर्स आहेत. त्यापैकीची अनेक कोविड सेंटर्स साधारण 50 टक्केसुद्धा भरली नाहीत. काही ठिकाणी कोविड सेंटरची जितकी क्षमता आहे त्याच्या अगदी 5 ते 10 टक्के सुद्धा रुग्ण नाहीत. त्यामुळे एकूण कोविड सेंटर्सपैकी साधार 8 कोविड सेंटर्स काही काळापूरती बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतल्याचे वृत्त आहे.