COVID-19 Death In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाचा मृत्युतांडव; राज्यात गेल्या 3 दिवसांत 2 हजार 17 रुग्णांचा मृत्यू
Death | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनामुळे (Coronavirus) पुन्हा एकदा भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज मोठ्या संख्येत कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. तर, राज्यातील मृत्यूचा आकडा देखील वाढत चालला आहे. याशिवाय, रुग्णालयात बेड मिळत नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. यातच संपूर्ण महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. राज्यात गेल्या 3 दिवसांत तब्बल 2 हजार 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे कळत आहे. यामुळे संपूर्ण राज्यात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रात कोरोनामुळे गुरुवारी (22 एप्रिल) 568 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर या आकड्यात आणखी भर पडली असून शुक्रवारी (23 एप्रिल) तब्बल 773 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान, आजही कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या जास्तच आहे. राज्यात आज 676 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. हे देखील वाचा- COVID-19 Vaccine: महाराष्ट्रात सर्वांना मोफत लस कधी मिळणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती

ट्वीट-

कोरोनाचा वाढता धोका पाहता महाराष्ट्र सरकारने राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन घोषीत केला आहे. राज्यात येत्या 1 मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. तसेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांनावर कडक कारवाई केली जात आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कामगारांसह अनेकजण जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत.