People being screened for coronavirus at the Chennai Central Railway Station (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणुने (Coronavirus) संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूची लागण होऊन आतापर्यंत 20 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 4 लाखांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केली जात आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने जमावबंदीचे आदेश लागू केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या रविवारी कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर संपूर्ण देशात 21 दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. यातच महाराष्ट्रात (Maharashtra) आणखी 5 नवे कोरोनाबाधीत रुग्ण (Corona Patients) आढळल्यामुळे राज्यात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.

आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 130 वर पोहोचली आहे. बुधवारी दिवसभरात 15 नवे रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 122 वर होती. मुंबईमध्ये प्रभादेवी भागामध्ये एका महिला फेरीवाली कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती. प्रभादेवी परिसरामध्ये असलेल्या एका कॉर्पोरेट ऑफिसजवळ ही महिला भोजन विक्रीचा व्यवसाय करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांना शोधून त्यांची केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. चाचण्या करण्यासाठी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर आज शुक्रवारी कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 130 पोहचली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: लॉकडाउन असताना घराबाहेर पडला, सख्ख्या भावाने भावाचा मुडदा पाडला, मुंबई येथील धक्कादायक घटना

ट्वीट-

भारतात आतापर्यंत 694 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यांपैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 43 लोक यातून बरे झाले असल्याची माहिती समोर आली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 130 वर पोहचली आहे. यापैकी 15 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत.