Coronavrius Cases In Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील 134 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; एकूण कोरोनाबाधितांची संख्या 10538 वर पोहोचली
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

Coronavrius Cases In Aurangabad: आज सकाळी औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील 134 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 10538 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 5 हजार 986 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 392 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात 4 हजार 160 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये 14, मोबाइल स्वॅब कलेक्शन पथकास 85 जण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. यातील काही रुग्ण हे मनपा हद्दीतील तर काही रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. (हेही वाचा - कोविड-19 संकटात Remdesivir चा काळा बाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने खरेदी केल्या औषधाच्या 60,000 बाटल्या)

मराठवाड्यातील जालना, नांदेड, बीड, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज सकाळी जालना जिल्ह्यात 82 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान, शनिवारी महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांनी 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी राज्यात 8 हजार 348 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर काल दिवसभरात 144 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.