ओमायक्रोनचे (Omicrone) रुग्ण दिवसेंदिवस राज्यात वाढतच आहे. आता शाळा, काॅलेज मध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. पुण्यातील (Pune) कोथरुड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमधील (World Peace University) मॅकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्षातील 13 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग (13 Students Test COVID-19 Positive) झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंती वाढली आहे. परिणामी पुढील काळात ऑफलाईन वर्ग व परीक्षांबाबत कोरोना विषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे. राज्य शासनाने (State Govt) दिलेल्या आदेशानुसार करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन वर्गांसाठी प्रवेश दिला जात आहे. ज्या विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे, त्यांना देखील नियमानुसारच प्रवेश देण्यात आला होता. तरीही ते करोना बाधित आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
दोन-तीन दिवसांपूर्वी कोरोना बाधित अढळून आलेले विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील सुप्रा स्पर्धेची तयारी करत होते. त्यांना विद्यापीठाच्या वर्कशॉपमध्ये स्पर्धेच्या तयारीसाठी प्रवेश दिला गेला होता. एका कोरोना बाधित विद्यार्थ्याच्या संपर्कात 25 विद्यार्थी आले होते. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यातील 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहेत. आठ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून चार विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यात एकही विद्यार्थी ओमायक्रॉनचा नाही आहे. (हे ही वाचा Maharashtra Winter Session 2021: राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आत्तापर्यंत 35 जणांना कोरोनाची लागण.)
एमआयटी प्रशासनाकडून कोरोना विषयक काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच कोरोना बाधित विद्यार्थ्याच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांना तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिणामी यामुळे पूर्ण कॅम्पस बंद करण्याचे कारण सध्या तरी समोर दिसत नाही. तसेच विद्यापीठाकडून सगळ्या प्रकराची काळजी घेतली जात आहे.