Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. महाराष्ट्रात बहुतांश जिल्हे हे रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या रेड झोनमधील नागरिकांना लॉकडाउनचे आदेश कठोरपणे पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तर लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कारवाई सुद्धा केली जात आहे. मात्र नागरिकांनी कोरोनापासून बचाव करायचा असल्यास स्वत:सह परिवाराची सुद्धा काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. याच दरम्यान, अकोला जिल्ह्यात एकाच दिवशी 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत अकोल्यात कोरोनाबाधितांचा आकडा 88 वर पोहचल्याची माहिती देण्यात आली आहे.

अकोल्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. आज अकोल्यात आणखी सहा जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र उपचार वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडू केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा कोरोनाच्या विरोधात लढायचे असल्याचे नियमांचे पालन करण्यासोबत घरीच थांबावे असे आवाहन करण्यात येत आहे.(मुंबई पोलिस खात्यामध्ये 250 जणांना कोरोनाची लागण, कुणीही ICU मध्ये नाही: पोलिस कमिशनर परम बिर सिंग यांची माहिती)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 16,758 वर पोहचला आहे. त्यापैकी 13199 अॅक्टिव्ह रुग्ण आणि 651 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर 3094 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. तर गेल्या दोन दिवसात 700 कोरोनाबाधित रुग्ण मुक्त झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.