Wife Killed Husband: प्रियकराच्या मदतीने रचला कट, पतीचा चाकूने भोसकून खून, आरोपींसह पत्नीला अटक
Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Wife Killed Husband: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एका पत्नीने आपल्या पतीच्या हत्येची सुपारी देत निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीसह ४ आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीने प्रियकरासोबत मिळून हा कट रचला होता. काल दुपारी एका व्यक्तीच्या पोट चाकू भोसकून हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिस आरोपीचा शोध घेत २४ तासांच्या आत त्यांना अटक केले.  (हेही वाचा-  नागपुरात माजी प्रेयसीने ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी तरुणावर केला ॲसिड हल्ला; गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हडको परिसरात ही घटना घडली. काल  दुपारी आरोपी पत्नीच्या सांगण्यावरून पतीची हत्या केली. एकाने पतीच्या पोटात चाकू भोकसला. यात तो गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिस यंत्रणा कामाला लागली. गणेश दराखे असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो राहत्या परिसरातील स्केटिंग ग्राउंडवर फिरत होता त्यावेळीस त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

मृत्यू झाल्यानंतर गणेशच्या पत्नीने पोलिसांत तक्रार न दिल्याने पोलिसांना तिच्यावर संशय आला. त्यामुळे तीला पोलिसांनी काही तासानंतर ताब्यात घेतले. पोलिस चौकीत सुरुवातीला तीनं उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांनी कसुन चौकशी घेतल्यानंतर तीनं गुन्ह्याची कबुली दिली. आरोपात सहभागी असलेल्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरु केली आहे.