Nagpur Acid Attack: नागपुर येथे आपल्या ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी, माजी प्रेयसीने तिच्या दोन साथीदारांसह 26 वर्षीय पुरुषावर ॲसिड हल्ला केला आहे. 25 एप्रिल रोजी कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) आवारात या चिडलेल्या महिलेने तिच्या दोन साथीदारांसह आपल्या माजी प्रियकरावर ॲसिड फेकले. या घटनेमध्ये पिडीत, गणेश भोयरचा चेहरा आणि छाती 20-30% भाजली आहे. ही घटना आठवडाभरापूर्वी घडली मात्र आतापर्यंत पीडितेने तक्रार देण्यास टाळाटाळ केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. पिडीत विवाहित असूनही मुख्य आरोपीने वर्षभरापूर्वी त्याच्यासोबत मंदिरात लग्न केले होते. मात्र नंतर ते वेगळे झाले. त्यानंतर आता या महिलेने भोयरवर ॲसिड हल्ला केला. याप्रकरणी कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गोकुळ महाजन यांनी सांगितले की, महिला व तिच्या साथीदारांना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. (हेही वाचा: Wife Killed Husband: प्रियकराच्या मदतीने रचला कट, पतीचा चाकूने भोसकून खून, आरोपींसह पत्नीला अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)