महाराष्ट्र: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे उद्या राज्यव्यापी आंदोलन, नाना पटोले यांनी दिली माहिती
Nana Patole | (Photo Credits: Facebook)

इंधन दरवाढीविरोधात (Fuel Price Hike in India)काँग्रेस पक्ष पेटून उठला असून उद्या महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी काँग्रेसने पूर्ण तयारी केली असून राज्यात 1000 हजार ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या आंदोलनाची रुपरेषा सांगण्यासाठी मिडियाशी संवाद साधला. नाना पटोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान 3 पेट्रोल पंपांवर हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण राज्याचे काँग्रेसच्या या आंदोलनाकडे लक्ष लागले आहे.

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने 100 रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल 92 रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल 100 रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाही. स्वयंपाकाचा गॅसही 900 रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत. मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात उद्या सोमवार 7 जून रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.हेदेखील वाचा- Sputnik लस जुलै, ऑगस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार, वितरकांशी चर्चा यशस्वी झाल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

उद्या म्हणजेच सोमवारी सकाळी 11 वाजता राज्यभर एकाचवेळी 1 हजार ठिकाणी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान 3 पेट्रोल पंपांवर आंदोलन करून मोदी सरकारचा तीव्र निषेध केला जाणार आहे, असंही ते पुढे म्हणाले.

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती जवळपास 64 डॉलर प्रति बॅरल एवढ्या कमी असतानाही पेट्रोल-डिझेलचे दर भरमसाठ वाढवलेले आहेत. मोदी सरकार हे सामान्य जनतेचे सरकार नसून ते फक्त मुठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.