चुकीचा एक्झिट पोल दाखवणाऱ्या मीडिया कंपन्यांनी माफी मागावी, बाळासाहेब थोरात यांची मागणी
Balasaheb Thorat | (Photo Credit: Facebook)

विधानसभा निवडणूकीचे निकाल लागण्यापूर्वी विविध मीडिया कंपन्यांनी यंदा कोणाची सत्ता स्थापन होणार याचे एक्झिट पोल त्यांच्या वहिन्यांवर दाखवले. मात्र मीडिया कंपन्यांनी दाखवलेल्या हे एक्झिट पोल चुकीचे ठरले. एवढेच नाही ज्या उमेदवारांना मत मिळणार नाही असे दिवसभर दाखवले तेच मताधिक्य मिळवत विजयी झाले आहेत. त्यामुळे आता खोटा एक्झिट पोल दाखवणाऱ्या कंपन्यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिक स्पष्टीकरण दिले आहे. त्यावेळी एक्झिट पोलचा सर्व्हे खोटा ठरल्याने त्यांच्यावर टीका केली आहे. एवढेच नाही उमेदवार यंदाच्या विधानसभेत पराभूत असे ही सांगण्यात आले. मात्र त्यांनाच मताधिक्य मिळत विजय झाला. खोट्या एक्झिट पोलमुळे जनमतावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मानसिकता सुद्धा बदलते असे थोरात यांनी म्हटले आहे.(Maharashtra Assembly Election Results 2019: नसीम खान, रमेश थोरात, यांच्यासहीत अवघ्या काही मतांनी विजयी झालेल्या उमेदवारांची माहिती घ्या जाणून)

त्यामुळे लोकांची दिशाभुल करणाऱ्या मीडिया कंपन्यांनी माफी मागावी अशी मागणी आता थोरात यांनी केली आहे. मात्र विधानसभेचे निकाल 24 तारखेला स्पष्ट होत यावेळी सुद्धा महाराष्ट्रात महायुतीने बहुमताचा आकडा गाठला असल्याचे सांगण्यात आले. तसेच राष्ट्रवादी-काँग्रेसला त्यांची सत्ता स्थापन करता येणार नसली तरीही समानधारक जागांवर विजय मिळवता आला आहे.