Maharashtra Election (FIle Image)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज गुरुवारी जाहीर झाला असून, राज्यातील काही मतदारसंघातील चुरशीच्या लढतीने राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाने अनेकांना धक्का दिला आहे. दरम्यान सांगोला, कोपरगाव, चांदवली, अर्जूनी मोरगाव, दौंड या ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. या मतदारसंघात शहाजी बापूराव पाटील, आशुतोष काळे, नसीन खान, मनोहर चंद्रिकापूरे, रमेश किशन थोरात यांच्या हाती यश आले आहे. त्याचबरोबर ही निवडणूक सर्व विजयी आमदारांसाठी अवस्मरणीय ठरली आहे. कारण, वरील सर्व उमेदवारांना या निवडणुकीत विजयासाठी मोठी झुंज द्यावी लागली असून,अवघ्या काहीच मतांनी त्यांचा विजय झाला आहे.

सांगोला मतदारसंघातील निकाल

1) शहाजीबापू राजाराम पाटील (शिवसेना) - 99464

2) डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख (शेकाप)- 98696

मतांचा फरक- 768

कोपरगाव मतदारसंघाचा निकाल-

1) आशुतोष अशोकराव काले (काँग्रेस) - 87566

2) स्नेहलता कोल्हे (भाजप)- 86744

मतांमधील फरक- 822

चांदवली मतदारसंघाचा निकाल-

1) नसीन खान (काँग्रेस)- 85470

2) दिलीप भाऊसाहेब- 85879

मतांमधील फरक- 409

अर्जूनी मोरगाव मतदारसंघाचा निकाल-

1) मनोहर चंद्रिकापूरे (काँग्रेस)- 72400

2) राजकुमार बडोले (भाजप)- 71682

मतांमधील फरक- 718

दौंड मतदारसंघाचा निकाल-

1) रमेश किसानराव थोरात (काँग्रेस)- 102918

2) राहुल सुभाषराव कूळ (भाजप)- 102763

मतांमधील फरक- 155

दरम्यान, सध्या कार्यरत असणाऱ्या सरकारचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी संपुष्ठात येणार आहे, त्यानुसार शपथविधी व सत्तास्थापनाचा कार्यक्रम पार पडेल.