काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन (Congress Former MLA Madhukar Thakur Passes Away) झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. पाठिमागील चार वर्षापासून मधुकर ठाकूर (Madhukar Thakur) हे प्रकृतीअस्वास्थ्याने त्रस्त होते. उल्लेखनिय असे की, मधुकर ठाकूर यांचा आज (15 जुलै) वाढदिवस होता. वाढदिनीच मधुकर ठाकूर यांची प्राणज्योत मालवली (Madhukar Thakur Passes Away on His Birthday). मधुकर ठाकूर यांनी अलिबाग उरण विधानसभा मतदारसंघातून (Alibag Uran Vidhan Sabha Constituency) काँग्रेस तिकीटावर आमदार म्हणून निवडूण आले होते.
मधुकर ठाकूर यांचा राजकीय प्रवास हा अत्यंत तळागाळातून झाला होता. सुरुवातीला ते झिराड ग्रामपंचायत सरपंच झाले. गावच्या सरपंच पदापासूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. 2004 ते 2009 या काळात त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले. पुढे त्यांनी काँग्रेस तिकीटावर अलिबाग-उरण मतदारसंघातून निवडणूक लढवली. काही काळ त्यांनी रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष आणि प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य अशा पदांवरही काम केले.
अलिबाग तालुक्यात असलेल्या तातीर्जे या मूळ गावी मधुकर ठाकूर यांच्यावर दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.