Nanabhau Patole in Nagpur Lok Sabha Constituency for Lok Sabha elections 2019 (Photo Credit: Twitter)

नागपूर (Nagpur) लोकसभा मतदारसंघामधील काँग्रेस (Congress) पक्षाचे उमेदवार नाना पटोले (Nana Patole) आणि त्यांच्या सहकार्यांनी निवडणूक प्रक्रियेत अवाजवी हस्तक्षेप करत निवडणूक आयोगाच्या (Election Commission) अधिकाऱ्यांवर दबाव टाकला होता.यामुळे आता नाना पटोले आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

प्रशांत पवार आणि नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. लोकसभा निवडणूकीच्या निकालाच्या मतमोजणीवेळी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत वाद घातला. परंतु या ठिकाणी फक्त उमेदवारांना प्रवेश असतो. तरीही त्यांनी वाद घातला.(अकोला येथे भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासह 10 जणांवर गुन्हा दाखल)

त्याचसोबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी व्हीव्हीपॅट मोजणी संदर्भात कोणत्या मशीनची उघडणी करावी आणि मतमोजणी ठिकाणी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नागपूर मतदारसंघामधून नितीन गडकरी यांनी नाना पटोले यांचा पराभव केला. या निकालात गडकरी यांना दोन लाख मताधिक्यांनी विजय मिळवला आहे.