अकोला (Akola) मधील मोहाळा गावात भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या गटात शस्त्रास्रे घेत हाणमारी झाली. या हाणामारीत मतीन पटेल नावाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांच्या विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतीन हे भाज पक्षात अल्पसंख्यांक आघाडीचे कार्यकर्ते आहेत. या हत्या प्रकरणी काँग्रेस पक्षाचे पराभूत झालेले हिदायत पटेल यांच्यासह अन्य दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुमताज पटेल हा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.(अकोला: राजकीय वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या; मतीन पटेल असे मृत व्यक्तीचे नाव)
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात वाद होत हे प्रकरण घडले असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच घटनेनंत मोहाळा गावात तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे.