
महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) राज्यात पदवीच्या विद्यार्थ्यांची कॉलेजेस (Degree Colleges) सुरू करण्याला परवानगी दिल्यानंतर आता मुंबईमध्ये बीएमसीकडूनही (BMC) त्याला हिरवा कंदील देण्यात आला आहे. मुंबई (Mumbai) मध्ये आता तब्बल 18 महिन्यांनंतर विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांचे दरवाजे खुल करण्यात येणार आहेत. येता बुधवार अर्थात 20 ऑक्टोबर पासून मुंबईची कॉलेजेस आता विद्यार्थ्यांसाठी खुली केली जात आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या अख्यत्यारित येणारि ग्रामीण भागातील महाविद्यालयं फेब्रुवारी महिन्यात काही काळ खुली करण्यात आली होती पण पहिल्यांदाच्या या कोविड संकटात मुंबई मधील कॉलेज देखील विद्यार्थ्यांनी गजबजून जाणार आहेत. मागील वर्षी 17 मार्चला मंबईतील कॉलेजेस बंद करण्यात आली होती. अनेक कॉलेज मध्ये आता 20 ऑक्टोबर पासून पीजी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल्स आणि वर्ग सुरू होणार आहेत.
बीएमसीच्या अॅडिशनल म्युनिसीपल कमिशनर अश्विनी भिडे यांनी 50% उपस्थितीसह वर्ग सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. वर्गात येणार्या विद्यार्थ्यांनि कोविड 19 लसीचे डोस घेतलेले असावेत. मात्र हा निर्णय 18 वर्षांखालील मुलांसाठी लागू नसेल. बीएमसी ने कॉलेजेसना सार्या कोविड 19 नियमावलीचं पालन करू न वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी लस घेतली नसेल तर कॉलेज कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांना लस जनजागृतीबद्दल धडे देण्याचे आणि स्पेशल कॅम्प घेण्याच्याही सूचना दिया आहेत. नक्की वाचा: Assistant Professors पदावर नियुक्तीसाठी आता जुलै 2023 पर्यंत किमान PhD च्या पात्रता निकषांमध्ये शिथिलता; UGC चा निर्णय .
राज्यात प्रत्येक ठिकाणाची कोविड 19 परिस्थिती पाहून कॉलेज खुली करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये 50% विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर शिक्कामोर्तब झाले आहे. सध्या मुंबई मध्ये कोरोना परिस्थिती नियंत्रणामध्ये आली असल्याने आता मुंबईतील गजबज पुन्हा सुरू झाली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही कॉलेजमध्ये वर्गात शिक्षण घेता येईल.
मुंबईत काही ज्युनिअर कॉलेजमध्ये या महिन्याच्या सुरूवातीला प्रॅक्टिकल्स सुरू झाले होते त्यामुळे आता डिग्री कॉलेजसाठी देखील तो निर्णय लागू असेल. अंडर ग्रॅज्युएटसच्या परीक्षा सुरू असल्याने आता पोस्ट ग्रॅज्युएट्सच्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये बोलावले जाणार आहे.
सध्या वर्ग ऑफलाईन सुरू झाले असले तरीही विद्यार्थ्यांच्या सेमिस्टर एंडच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर झाला आहे.