राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना (Bhumiputras) रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सोमवारी दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचं (Mahajobs Web Portal) लोकापर्ण होणार आहे. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांची उपस्थित असणार आहे.
महाजॉब्ज या वेबपोर्टलमुळे राज्यातील तरुणांना रोजगार मिळण्यास चालना मिळणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुक उमेदवाराने केवळ आपली माहिती महाजॉब्स पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्याकडून इच्छुक उमेदवाराला नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. परिणामी राज्यातील तरुणांच्या हाताला काम मिळणं शक्य होणार आहे. (हेही वाचा - मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या 12 उपायुक्तांच्या बदल्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून स्थगिती)
राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ वेबपोर्टलचे उद्या १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार लोकापर्ण. उद्योगमंत्री @Subhash_Desai ,
यांच्यासह मंत्री @Dwalsepatil , @nawabmalikncp , राज्यमंत्री @iAditiTatkare उपस्थित राहणार. pic.twitter.com/cSB856GoaJ
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 5, 2020
दरम्यान, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कमी वेळात हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. महाजॉब्स पोर्टलद्वारे स्थानिक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक उद्योग बंद पडले आहेत. परंतु, सरकारने या उद्योगांना परवानगी दिली आहे. तसेच भूमिपुत्रांनी नवनवीन उद्योग सुरू करावे, असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. या उद्योगांना मोठ्या प्रमाणावर कुशल, अर्थकुशल तसेच अ-कुशल कामगारांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे स्थानिकांना महाजॉब्सद्वारे रोजगार मिळून देण्यात येणार आहे.