मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज (11 ऑक्टोबर) दुपारी 1.30 वाजता राज्यातील जनतेला संबोधणार आहे. आज मुख्यमंत्री नेमकं कशावर बोलणार, याची उत्सुकता जनतेला आहे. तब्बल महिन्याभरानंतर मुख्यमंत्री लाईव्हच्या माध्यातून जनतेसमोर येत आहेत. मागील वेळेस कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' हे अभियान, शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण या मुद्दांवर मुख्यमंत्री बोलले होते. त्यामुळे आज नेमकं मुख्यमंत्री काय बोलणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे लाईव्ह पाहण्याची सोय युट्युब, फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमांवर उपलब्ध आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून देशासह राज्यातील जनता, प्रशासन, आरोग्य यंत्रणा कोरोना व्हायरस संकटाचा सामना करत आहे. दिवसागणित वाढत चाललेले संकट नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण यांसारखे महत्त्वाचे प्रश्न सरकारसमोर आहेत. तसंच ओबीसी नेत्यांसोबत मुख्यमंत्र्याची अलिकडेच बैठक पार पडली आहे. याबद्दल मुख्यमंत्री बोलणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला जनतेशी संवाद; पहा कोविड-19, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न याबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले)
CMO Maharashtra Tweet:
लाइव्ह पहा/Watch LIVE
Facebook: https://t.co/J3Ecboh55i
Twitter: https://t.co/NbUn4FK6B5
YouTube: https://t.co/MPci41dOJ3
Instagram: https://t.co/rHVWldGd3O
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 11, 2020
दरम्यान, राज्यात अनलॉक 5 ला सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्याबद्दल मुख्यमंत्री सविस्तर बोलतील, असाही अंदाज बांधला जात आहे. यापूर्वी मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत सामान्यांसाठी रेल्वे सुरु करण्याचा विचार असल्याचे एका मुलाखतीत म्हटले होते. तर सामान्यांसाठी रेल्वे सुरु करण्यास काही हरकत नसल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही अनेकदा दिले आहेत. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री काही घोषणा करणार का? हे जाणून घेण्यासाठीही सर्वसामान्य जनता उत्सुक आहे.