ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रामध्ये (Tadoba-Andhari Tiger Reserve) नुकताच एका महिला वनरक्षकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्याच स्तरातून या घटनेवर हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. आज (21 नोव्हेंबर) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वामी ढुमणे (Swati Dhumne)यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे. स्वामी ढुमणे यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना आज त्यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत, पतीला वन विभागाच्या सेवेत रुजू करून घेण्यात येईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे.
सरकारी मदतीसोबतच स्वामी ढुमणे यांच्या कुटुंबाला ताडोबा फाऊंडेशनकडून पाच लाखांचा चेक आणि ताडोबा संवर्धन प्रतिष्ठानकडून 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. नक्की वाचा: Black Panther च्या अंगावरही दिसतात स्पॉट्स? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ब्लॅक पॅंथरच्या फोटो व्हायरल मध्ये दिसली दुर्मिळ झलक!
CMO Tweet
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत व त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 21, 2021
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र प्रगणना कार्यक्रमाअंतर्गत प्राण्यांच्या पाऊलखुणा नोंदवण्याच्या कार्यक्रमाला काल (20 नोव्हेंबर) दिवशी सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशीच महिला वनरक्षकावर हल्ला करून वाघिणीने त्यांना जागीच ठार केले. ही घटना कोलारा येथील कोअर झोनच्या कक्ष क्रमांक 97 मध्ये घडली. शनिवारी सकाळी सात वाजता सहकाऱ्यांसह कोलारा गेटपासून 4 किमीपर्यंत पायी चालत गेल्यावर त्यांना 200 मीटर अंतरावर एक वाघीण बसली होती. त्यांनी अंदाजे अर्धा तास वाट पाहिली आणि जंगलातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु याच दरम्यान वाघिणीने स्वाती यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना फरफटत नेले. दरम्यान या घटनेत स्वाती यांचा मृत्यू झाला