Bacchu Kadu On Ajit Pawar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये अजित पवार यांची एन्ट्री झाल्याने सत्ताधारी आमदारांमध्ये मोठी नाराजी आहे. सरकार समकर्थक आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी ही नाराजी स्पष्ट व्यक्त केली आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाची एन्ट्री झाल्याने नाराजी असणे स्वाभाविक आहे. आजवर आपला घास खाणारी राष्ट्रवादीच सत्तेत आल्यामुळे इतरांची जागा आपोआपच कमी होते. त्यामुळे ही नाराजी असणे सहाजिक आहे. त्यातच जर त्यांच्याकडे अर्थखाते गेले तर मोठी अडचण होऊ शकते, अशी काहींची भावना आहे, असेही बच्चू कडू यांन म्हटले आहे.
राज्य सरकारमध्ये सगळे काही ठिक आहे. पण, बदललेल्या स्थितीमध्ये खूप गोष्टी काळजीपूर्वक कराव्या लागतील. त्या केल्या तर सगळेच चांगले होईल. नाहीतर सगळाच बिघाडा होऊ शकतो. वरवर दिसायला सगळ्या गोष्टी सोप्या वाटत असल्या तरी आतून त्या तितक्या सोप्या नाहीत. त्यात अनेक गोष्टी असतात, मंत्रिपदं.. खातेवाटप, पालकमंत्री पद अशा अनेक गोष्टी असतात. त्यावरुनही नाराजी-आनंद असतो. त्यामुळे सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच निर्णय घ्यावा लागतो, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, CM Eknath Shinde on Uddhav Tahckeray: देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याचा काय अधिकार? एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल)
बच्चू कडू सध्या त्यांच्या मतदारसंघात आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारले असता ते म्हणाले मंत्रिपदासाठी मुंबईतच थांबायला लागते असे काही नाही. इतरांमध्ये आणि बच्चू कडू यांच्यात हाच नेमका फरक आहे. मला कोणत्याही पदाची, मंत्रिपदाची आपेक्षा नाही. आपण ससत काम करत असतो. पद असले नसले तरी काम हे करावेच लागते. त्यामुळे आपण सध्या आपल्या मतदारसंघात आहोत. पाहूया काय होतंय, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बच्चू कडून यांनी सरकारमध्ये सर्वच काही अलबेल नसल्याचे आपल्या विधानांमधून दाखवून दिले आहे. बच्चू कडू यांनी कालच म्हटले होते की, बच्चू कडून कोणाच्या वाकड्यात जात नाही आणि जर कोणी बच्चू कडू यांच्या वाकड्यात गेले तर मात्र तो वाटोळे करतो, असे म्हटले होते.