अहमदनगर-औरंगाबाद (Ahmednagar-Aurangabad Route) मार्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या उल्लेखाने झळकत असलेला एक बॅनर सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. या बॅनरमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजप जनक्षोभाचा धनी ठरण्याची शक्यता आहे. 'देवांचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा राजा देवेंद्र' असा मजकूर या बॅनरवर झळकताना दिसत आहे. शेखर मुंदडा नावच्या व्यक्तीने शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिमेसह हा मजकूर या बॅनरच्या माध्यमातून प्रसिद्ध केला आहे. हेमंतराव मुळ्ये नावाच्या ट्विटर युजर्सने या बॅनरचा फोटो ट्विट केला आहे. या ट्विटखाली तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान, हेमंतराव मुळ्ये यांनी या बॅनरचा फोटो काढून तो ट्विट केला आहे. तसेच, हे ट्विट @CMOMaharashtra, @BJP4Maharashtra, @NagarPolice या मुख्यमंत्री, महाराष्ट्र भाजप आणि नगर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटला टॅग केले आहे. तसेच, या ट्विटमध्ये त्यांनी 'जय शिवराय मित्रांनो, आमच्या अहमदनगरमध्ये औरंगाबाद रोडवर देवांचा राजा इंद्र
महाराष्ट्र चा राजा देवेंद्र असा मजकूर असलेला बोर्ड आहे तरी मुख्यमंत्रीसाहेब आणि महाराष्ट्र भाजपा आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावा महाराष्ट्राचा राजा एकच छत्रपती शिवाजी महाराज असे म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra Floods 2019: अमिताभ बच्चन यांच्याकडून पूरग्रस्तांना 51 लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार)
हेमंतराव मुळ्ये ट्विट
जय शिवराय मित्रानो
आमच्या #अहमदनगर मध्ये औरंगाबाद रोड वर
देवांचा राजा इंद्र
महाराष्ट्र चा राजा देवेंद्र
असा मजकूर असलेला बोर्ड आहे
तरी @CMOMaharashtra साहेब आणि @BJP4Maharashtra आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावा
महाराष्ट्राचा राजा एकच
छत्रपती शिवाजी महाराज @NagarPolice pic.twitter.com/olaiFrjoDu
— H.Mulay (Jahagirdar) (@hemantraomulay) August 18, 2019
लक्षवेधी शब्दांचा वापर करत घोषवाक्ये तयार करुन प्रचाराचा धडाका उडवून देणे भाजपसाठी नवे नाही. या आधीच्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपने शब्दांचा चपकल वापर करत जनतेची नस पकडली होती. मात्र, अशाच शब्दांचा वापर करुन जनतेची नस पकडू पाहणाऱ्या एका एका व्यक्तीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपाची चांगलीच कोंडी झाली आहे.
ट्विट
शेजारीच पाटी आहे... 'येथे कोणीही कचरा टाकू नये'
तरीही मुंदडाने सगळा कचरा लावलाच.
त्या चप्पलचाटूला विचारा, विना सिक्युरिटी तुझा नकली राजा लोकांना सामोरे जाईल का? यायला लाव मग बघ जनतेचं प्रेम कसं ओसंडून वाहतं ते..
— एक मराठा (@Maratha_Nashik) August 19, 2019
दरम्यान, हेमंतराव मुळ्ये यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये एक मजेशीर योगायोग जुळून आला आहे. मुळ्ये यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये 'देवांचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा राजा देवेंद्र' या मजकुरासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा झळकत आहे. पण, या बॅनरखालीच 'येथे कोणी कचरा टाकू नये' असेही बॅनर झळकत आहे. मुख्यमंत्र्यांना लक्ष करताना अनेक युजर्सनी 'येथे कोणी कचरा टाकू नये' या व्याक्याचा चपकल वापर करत या बॅनरवर टीका केली आहे. एक युजर्सने म्हटले आहे की, 'शेजारीच पाटी आहे... 'येथे कोणीही कचरा टाकू नये' तरीही मुंदडाने सगळा कचरा लावलाच. त्या *** विचारा, विना सिक्युरिटी तुझा नकली राजा लोकांना सामोरे जाईल का? यायला लाव मग बघ जनतेचं प्रेम कसं ओसंडून वाहतं ते.'
युजर - प्रकाश गाडे पाटील ट्विट
ज्यानेपण बँनर लावलय कचऱ्यात जमा केलय हे त्याला कळलंच नाही https://t.co/qi6MxYsI0u
— प्रकाश गाडे पाटील (@Prakashgadepat1) August 19, 2019
युजर- सुजीत जाधव ट्विट
आपल्या लोकांची घाण सवय आहे कचरा टाकू नका म्हंटल की बरोबर उलटंच करणार....
— Satish A Hadole (@Hadole55) August 18, 2019
दुसरा एक युजर म्हणतो की, खरच आपले लोक , ' जिथे #घाण ,कचरा टाकु नका असे लिहलेले असते नेमके त्याच ठिकाणी ते ,कचरा टाकतात'. आणखी एका युजर्सने म्हटले आहे की, 'कचरा टाकू नये अशी स्पष्ट सूचना असताना अशी वैचारिक घाण टाकणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे'