![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/09/arrest.jpg?width=380&height=214)
7 Bangladeshi Arrested: मुंबईतील आरसीएफ पोलिसांनी चेंबूरमधील माहुल गावातून 7 बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे सर्व जण येथे बेकायदेशीर रीत्या भारतात रहात होते. अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशी नागरिकांमध्ये 3 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेले बांग्लादेशी नागरिक गेल्या पाच वर्षांपासून मुंबईतील चेंबूर येथे बेकायदा वास्तव्यास होते. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या माहुल गावात बांग्लादेशातून आलेले एक कुटुंब गेल्या काही वर्षांपासून बेकायदा वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला असता ते भारतीय असल्याची कोणतीही कागदपत्रे दाखवू शकले नाहीत, त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. बांग्लादेशी नागरिक मोहम्मद शरीफूलने अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर त्याच्या अटकेबाबत मुंबई पोलीस सातत्याने कारवाई करत आहेत. यादरम्यान हि कारवाई करण्यात आली आहे. हेही वाचा: Mumbai: मुंबईत एनसीबीकडून केलेल्या कारवाईत 11.54 किलो कोकेन आणि 4.9 किलो ड्रग्स जप्त, 4 जणांना केली अटक
भिवंडीतील भारदवाड परिसरात या दोन्ही महिला बेकायदा राहत होत्या. ठाण्यातील भिवंडीत बेकायदा राहणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांवर पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली होती. काही बांग्लादेशी येथे बेकायदेशीरपणे राहत असल्याची गुप्त माहितीही त्यांच्याविषयी होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक केली. यापूर्वी गुन्हे शाखेच्या पथकाने बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई करत नाशिकमधील एका बांधकाम साइटवर छापा टाकून ८ बांग्लादेशी नागरिकांना अटक केली होती.
गुप्त माहितीवर झालेली कारवाई
गेल्या आठवड्यात आम्हाला माहिती मिळाली होती की बांग्लादेशी नागरिक 600 लोकांच्या मध्ये एका बांधकाम स्थळी काम करत होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले कि, “नाशिक पोलीस बांग्लादेशी मूळच्या बेकायदेशीर स्थलांतरितांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी मोहीम चालवत आहेत. आमच्या टीमने गुप्तपणे तपास केला आणि 8 संशयितांशी चौकशी केल्यानंतर हे सत्यापित झाले की ते बांग्लादेशी नागरिक आहेत.