मुंबईतील (Mumbai) सर्व चर्च रविवार, 29 नोव्हेंबरपासून खुली होणार आहेत. त्यासोबतच मासेस (Masses) आणि सोहळ्यांसाठी देखील परवानगी देण्यात आली आहे. यासाठी कोविड-19 नियमांचे (Covid-19 Protocols) पालन करणे अनिवार्य आहे. राज्य सरकारने 16 नोव्हेंबर पासून सर्व धार्मिक स्थळं उघडण्यास परवानगी दिली होती. तसंच चर्च मध्ये केवळ खाजगी प्रार्थनांना परवानगी देण्यात आली होती. परंतु, मुंबई मधील चर्चेस बंद होते. सरकारने धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे उघडण्यास अचानक परवानगी दिल्यामुळे कोविड-19 नियमांचे पालन करण्यासाठी पुरेशी सोय चर्चेस मध्ये उपलब्ध नव्हती. फूट पॅडल सॅनिटायझर डिस्पेंसर, सोशल डिस्टसिंग, मास्कची उपलब्धता ही सर्व तायरी करण्यासाठी हा वेळ घेण्यात आल्याचे बॉम्बेच्या आर्कबिशप चे प्रवक्ता फादर निजेल बॅरेट यांनी सांगितले.
फादर बॅरेट म्हणाले की चर्च पुन्हा सुरू झाल्यानंतरही जे लोक घराबाहेर पडू शकत नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाइन मास सुरू राहील. यामुळे लोकांना चर्चमध्ये जमत नसले तरी त्यांच्या प्रार्थना चालू राहू शकतात. (Maharashtra Lockdown: राज्यात येत्या 31 डिसेंबर पर्यंत लॉकडाऊन कायम, Mission Begin Again नुसार 'या' गोष्टी राहणार सुरु)
ANI Tweet:
Churches in Mumbai to restart mass services from tomorrow, with guidelines to ensure #COVID-appropriate behaviour.
(File photo) pic.twitter.com/BQjY1tk1MU
— ANI (@ANI) November 28, 2020
तसंच कोविड-19 संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे लोकांना मदत करण्यासाठी चर्चच्या वतीने संदेश जारी करण्यात आला आहे. प्रार्थनांमध्ये ठराविक वेळेचे अंतर ठेवण्यात येईल आणि एक तृतीयांश लोकांनाच एकावेळी चर्चमध्ये प्रवेश मिळेल, असेही फादर बॅरेट यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसची दुसरी लाट रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मुंबईमधील कोरोना बाधितांची संख्या 2,80,818 वर पोहचली असून आतापर्यंत 10,757 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2,54,458 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या 14,801 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.